अकोला :- शुक्रवारला व्यावसायिक स्पर्धेच्या नादात औषधाने भरलेला ट्रक फटाकाने पेटवण्याच्या प्रयत्न झाला,इग्निशन डिवाइसद्वारे फटाके पेटवल्यामुळे काही प्रमाणात औषध साठ्याचे नुकसान झाले व इतर साठा सुरक्षित राहायला या प्रकरणाची माहिती होताच पोलिसांनी धीरज राणे याला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र राणे याचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बिजनेस होता त्याच्याकडे सलीम खान बशीर खान हा जितेंद्र राणे यांच्याकडे १२ वर्षे चालक म्हणून काम करायचा. त्यानंतर त्याने स्वतःच्या ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केला त्यामुळे दोघांमध्ये ट्रान्सपोर्ट स्पर्धा वाढली जितेंद्र राणे यांचा मुलगा धीरज याने सलीम खान बशीर खान याचे नुकसान व्हावे
यासाठी एका बॉक्समध्ये फटाके, कापूस, पेट्रोलच्या बाटल्या व इग्निशन जोडून तो बॉक्स खान कडे डिलिव्हरीसाठी पाठविण्यात आला. खान याने तो बॉक्स इतर बॉक्ससह ट्रक मध्ये ठेवला व मध्यरात्री त्या बॉक्समधून फटाके फुटण्याचा आवाज आला, खान याने तपास केले असता धीरज राणे याने कारवाई केल्याचे लक्षात आले, त्यांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली व पोलिसांनी धीरजला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.