बुलढाणा :-व्हीव्हीपॅटवर मतदाराने मतदान केले आणि केलेले मतदान खरंच त्या उमेदवाराला गेलं की नाही यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो. व्हीव्हीपॅट म्हणजे ‘व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल’ होतो,मात्र एखाद्या मतदात्यांनी मतदान केल्यानंतर त्याने केलेले मतदान हे योग्य उमेदवाराला न जाता दुसऱ्याला गेले असा आक्षेप घेतला, आणि तो आक्षेप खोटा ठरला तर त्या व्यक्तीला ६ महिने कारावास व एक हजार रुपये दंड देण्याची तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे.
दोन वेळा मतदान
मतदात्याने मतदान केल्यानंतर ते मत त्याच उमेदवाराला न जाता अन्य उमेदवाराला गेले हा आक्षेप घेतल्यानंतर लगेच त्या मतदात्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाईल, व त्यानंतर केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्या मोजल्या जातील जर आक्षेप खोटा ठरला तर कलम ४९ अंतर्गत त्या मतदात्यावर ६ महिने कारावास व एक हजार रुपये दंडाची तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे. जर आक्षेप खरा ठरला तर त्या मतदात्याला दुसऱ्यांदा मतदान करता येईल.
पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीन मधून उमेदवाराचे नाव, क्रमांक आणि चिन्ह असलेले स्लिप ७ सेकंदापर्यंत दिसेल व ती स्लिप सीलबंद पेटीमध्ये पडल्यानंतर बीप वाजेल. जर तुम्ही मतदान केलेल्या उमेदवाराची चिट्ठी दिसली नाही किंवा दुसऱ्या उमेदवाराची चिठ्ठी दिसली त्यावेळेस आक्षेप घेऊ शकता व मतदान थांबून तपासणी केली जाते, जर आक्षेप खोटा ठरला तर त्या मतदात्यावर कारवाही करण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, आता २० नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान आहे म्हणून सर्व विधानसभा मतदान संघातील केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे. सर्वसामान्य मतदातांचे विश्वास वाढावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन लावलेली आहे,पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीन मधून उमेदवाराचे नाव, क्रमांक आणि चिन्ह असलेले स्लिप ७ सेकंदापर्यंत दिसेल .
व ती स्लिप सीलबंद पेटीमध्ये पडल्यानंतर बीप वाजेल. जर तुम्ही मतदान केलेल्या उमेदवाराची चिट्ठी दिसली नाही किंवा दुसऱ्या उमेदवाराची चिठ्ठी दिसली त्यावेळेस आक्षेप घेऊ शकता व मतदान थांबून तपासणी केली जाते, जर आक्षेप खोटा ठरला तर त्या मतदात्यावर कारवाही करण्यात येईल.