Wardha

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन तिच्याकडून अधिकचा अभ्यास करून घेतो, व चिमुकलीला घेऊन नराधम शिक्षकाने शिकवणी वर्गात नेऊन लैंगिक छळ केला. या प्रकरणाची माहिती होताच रामनगर पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली

व न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मिळालेला माहितीनुसार, आरोपी शिक्षकाचे नाव प्रांजल लोहकरे हा रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता, त्याने सायंकाळला सहाच्या दरम्यान अल्पवयीन चिमुकलीच्या घरी कॉल केला. व चिमुकलीच्या आईने कॉल उचलला,

व तुमची मुलगी अभ्यासात कमी आहे मी तिला माझ्या आधीच्या शिकवणी वर्गात शिकवण्यासाठी घेऊन जातो असे सांगू लागला. तेव्हा चिमुकलीचे वडील नोकरीला गेले होते म्हणून आईने अभ्यास चांगला होईल म्हणून अधिकच्या शिकवणी वर्गात जाण्यास विश्वासाने परवानगी दिली.मात्र नराधम शिक्षकाने शिकवणी वर्गात नेऊन ११ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला

व रात्री ९ ला तीच्या घरी सोडले तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला, व आईने त्वरित रामनगर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी लगेच नराधम शिक्षकाला अटक करून न्यायालयात हजर केले, व न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपीला कोठडीत ठेवले.

Vidarbha Trends Team

Recent Posts

मोबाईल बंदी असतांनाही मतदान कक्षात मोबाईल

बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या चित्रफिती…

58 minutes ago

बाजारात सोयाबीनचे दर वाढेना

वाशिम:- वाशिम मधील बाजारात सोयाबीनचे दर निवडणुकीनंतर वाढतील अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती, पण निवडणुकीनंतर…

1 hour ago

दुचाकी घसरल्यामुळे एक जखमी तर एक ठार

अमरावती:- २१ नोव्हेंबर रोजी दुचाकी घसरल्यामुळे १ च्या सुमारास खेडनजीक गावातील अपघातात ६४ वर्षीय इसमाचा…

3 hours ago

सायबर फसवणुकी पासून सावधान

वर्धा:- सायबर फसवणुकीपासून सावधान रहा असे आवाहन जिल्हा पोलीस व सायबर सेल विभागाने केले आहे,…

5 hours ago

मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना धान कापणीच्या कामात अडचणीं

चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…

23 hours ago

वृद्धाचा घरी परततांना अपघातात मृत्यू

अमरावती :- २० नोव्हेंबरला दोनच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान करून घरी परतताना अपघातात मृत्यू…

24 hours ago

This website uses cookies.