व्याहाड खुर्द ( जि चंद्रपूर): या गावातील जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकेने सातव्या वर्गामध्ये असलेल्या आठ विद्यार्थ्यांना मारहाण केले, यामधील दोन विद्यार्थ्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. आपल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत दारू मिसळल्याच्या संशयावरून शिक्षकेने विद्यार्थ्यांना मारहाण केली .ही घटना शनिवारी ( ता.२८ )घडली.असून शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला आहे .व्याहाड खुर्द येथे उच्च प्राथमिक शाळा आहे.या शाळेमध्ये पहिले ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात. (ता.२८)
शिक्षकेवर झाला गुन्हा दाखल; विद्यार्थ्यांना मारहाण
नेहमीप्रमाणे शाळा भरली व सर्व शिक्षक आपापल्या वर्गावर जाऊन शिकविण्यास सुरुवात केली. दुपारी १ च्या सुमारास शिक्षिका उज्वला पाटील सातव्या वर्गात शिकविण्यात गेल्या.त्यांनी पाण्याची बॉटल सोबत आणली होती शिकवत असतांना त्यातून पाणी पिताना त्या बॉटल म्हणून त्यांना दारूचा वास आला.
त्यामुळे बाटलीमध्ये कुणीतरी दारू मिसळ गैरसमज झाला व त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व १९ विद्यार्थ्यांचे दप्तर तपासले. मात्र, त्यांना काहीच आढळले नाही .त्यामुळे आठ विद्यार्थ्यांना मारहाण केली यामधील दोन विद्यार्थ्यांना जास्त दुखापत झाली. त्यानंतर सांगली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच पालक शाळेत हजर झाले व गोंधळ झाला पालकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी विस्तार अधिकारी, पोलीस व केंद्रप्रमुखही हजर झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. केंद्रप्रमुख किशोर येनगंटीवार, विस्तार अधिकारी किशोर बारसाकडे यांनी गट शिक्षणाधिकाऱ्याकडे कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठाकडे अहवाल पाठविला. लगेच ठाणेदारांनी शिक्षिका उज्वला पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पालकांनी म्हटले आमच्या मुलांनी असे कोणते काम केले नाही. तरीही शिक्षिकेने प्रेमाने विचाराला पाहिजे होते. एखाद्या वेळी शिक्षा केली तर मान्य होईल, पण दुखापत होईल अशी शिक्षा करणे योग्य नाही अशा घटना पुन्हा घडू नयेत.
- उज्वला पाटील, सहाय्यक शिक्षिका
शिक्षिका पाटील म्हणाल्या की पाणी पिण्याच्या बाटलीमध्ये दारू टाकण्यात आले म्हणून मला विद्यार्थ्याकडूनच माहित झाले, मला त्या विद्यार्थ्यांची नावे माहित आहेत. म्हणून त्यांना शिक्षा म्हणून त्यांना मारले ही घटना माझ्यासोबत तीन वेळा घडली आहे.