बुलढाणा :- मलकापूर मधील व्यापाराला नफाचे अमित दाखवून २४ लाख २७ हजार ५०० रुपयाची फसवणूक २३ मार्च रोजी झाली होती, या प्रकरणी सायबर पोलिसांनी तपास करून २१ ऑक्टोबर रोजी आरोपीला पकडण्यात आले.व्हाट्सअप व इतर समाज माध्यमावर शेअर मार्केटमध्ये नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जाते.
सोशल मीडियावर फ्रॉड ॲप तयार करून हातोहात आर्थिक फसवणूक केल्या जाते. त्याच प्रकारे मलकापूर मधील व्यापाऱ्याला शेअर मार्केटमध्ये तिप्पट नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून २४ लाख २७ हजार ५०० रुपये वेगवेगळ्या अकाउंटवर मागवले.
व्यापाराला फसवणूक झाल्याचे करतात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली, पोलिसांनी आरोपी गणेश खैरे याची तपास करून त्याला २१ ऑक्टोंबर रोजी अटक करण्यात आली.