अमरावती:- पिंपळखुटा येथे बुधवार ला १२ वाजताच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने झोपेत असलेल्या महिला व तिच्या मुलावर ज्वलनशील केमिकल टाकले व त्यानंतर त्याने स्वतः विष प्राशन केले. यानंतर उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला व मुलावर नागपूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे, शेजारील विष प्राशन केलेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव नंदा जानराव मेश्राम व मुलाचे नाव नितीन मेश्राम (२८) आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून आरोपी मंगेश शामराव मेश्राम याने महिला व मुलाच्या अंगावर ज्वलनशील केमिकल टाकले, महिला व मुलगा हे दोघेच मायलेकं पिंपळखुटा येथील नंदा गावी राहतात.
त्यांच्याच घरामागे आरोपी मंगेश चे घर आहे मंगेशने रात्री १२ च्या दरम्यान त्याची पत्नी व या महिलेच्या मुलाच्या अनैतिक संबंधावरून दोघे ही मायलेकावर ज्वलनशील केमिकल टाकून जाळले, यात महिलेच्या उपचारापूर्वी मृत्यू झाला. तर मुलगा नितीन हा ७० टक्के भाजला असून नागपूर येथील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.आरोपीने मायलेकावर केमिकल टाकल्यानंतर स्वतः विष प्राशन केले त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अमरावती येथे उपचार सुरू आहे.
नितीन मेश्राम व मंगेशच्या पत्नीचे काही दिवसापासून अनैतिक संबंध सुरू होते, या घटनेची माहिती मंगेशला होताच त्याने कट रचून दोघेही मायलेकाच्या अंगावर ज्वलनशील केमिकल टाकून जाळले. व त्यानंतर त्याने स्वतः विष प्राशन केले यात महिलेच्या मृत्यू झाला, व नितीन मेश्राम हा ७० टक्के भाजला त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. या घटनेची पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करीत आहेत
बुलढाणा :- १० नोव्हेंबरला पेट्रोलपंप जवळुन ट्रक चोरी झाले, ही घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेज…
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
This website uses cookies.