वर्धा: शेतकऱ्यांची योजनेच्या नावाखाली होत आहे फसवणूक केंद्र सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान नीधी योजनेद्वारा पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. पण या योजनेचे खाते अपडेट करा म्हणून मेसेज येतो आणि बँकेचे खाते रिकामी झाल्याची माहिती दररोज सायबर सेलकडे मिळत असते. त्यामुळे अशा फसवणाऱ्या लिंकपासून सावध राहण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियाद्वारे आपला पंतप्रधान सन्मान निधी जमा झाले का? ते बघा तुमचा अडकलेला हप्ता आत्ताच मिळवा, अशा प्रकारच्या अनेक मेसेज येत असतात. अशाच प्रकारचे एपीके लिंक वायरल होत असल्याचे दिसून येत आहे. या लिंक वर क्लिक करताच शेतकऱ्यांची सायबर फसवणूक होत आहे. हे लिंक क्लिक केल्यानंतर मोबाईल मध्ये अप्लिकेशन डाऊनलोड होते आणि त्यानंतर मोबाईल सिम हॅक होते.
अशा प्रकारची फसवणूक झाल्यास बँकेला किंवा सायबर सेलशी संपर्क साधावा.
सायबरकडे ७० वर तक्रारी ‘आठ महिन्यात’
मुख्यता: पीएम किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांचे फसवणूक होत आहे. तब्बल ७० तक्रारी मिळाल्या ,जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात या तक्रारी मिळाल्या, काही शेतकऱ्यांची कमी रक्कम गेल्याने त्यांनी तक्रार करण्याचे टाळले. तर काहींनी गुन्हा दाखल करण्यास मनाई केली. दिवसेंदिवस ही फसवणूक वाढतच आहे.
बँकिंगची गुप्त माहिती देणे टाळावे
कोणतेही सरकार बँकेची माहिती जाणून घेण्यासाठी कॉल करत नाही. म्हणून अशा फसवणाऱ्या कॉल ना माहिती देऊ नका. त्यामुळे कोणतीही ई-केवायसी नाव घेणाऱ्या कॉल्सना माहिती देऊ नका.
सालोडच्या शेतकऱ्यांना ८६ हजारांचा गंडा
सालोड येथील विनोद मोतीराव फटिंग यांच्या व्हाट्सअप वर पीएम किसान योजनेची लिंक आली आणि विनोदने त्या लिंक वर क्लिक करून त्यावर स्वतःचा मोबाईल नंबर टाकला आणि त्यावेळेसच त्यांच्या मोबाईलचे नेटवर्क गेले विनोद यांनी मोबाईल दुकानात दाखवला असता त्यांना मोबाईल कंपनीचे ऑफिसमध्ये जाण्यास सांगितले मोबाईल कंपनीने नवीन सिम कार्ड दिले. मोबाईल सुरू होताच विनोद च्या खात्यातून एसबीआय खात्यातून चार व्यवहाराचे ५२ हजार ६४ रुपये तर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतील दोन व्यवहारातून २४६५ आणि एचडीएफसी बँकेतून ३१ हजार ४००रुपये असे एकूणच ८५ हजार रुपये गेल्याचे दिसले .ही नोंद २५रोजी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
ई- केवायसी मार्फत सुरू आहे ‘फ्रॉड’
ई-केवायसी मार्फत तुम्हाला कोणतीही लिंक, कॉल्स ,मेसेज किंवा काहीही आल्यास त्यावर चुकूनही क्लिक करू नका नाहीतर फसवणारे तुमची फसवणूक करू शकतात.
या नागरिकांपासून दूर राहा
या योजनेअंतर्गत अनेक शेतकरी आहेत त्यांना काही हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. यामागे कारण असू शकतात .जर कोणी तुम्हाला हप्ता मागितला किंवा त्या बदल्यात पैसे घेतले तर, सावध राहा कारण असे लोक पैसे घेतात व फसवत असतात.