अकोला :- एचपीच्या कृषी पंपावरील मोफत वीज देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे, या योजनेच्या फायदा ४५ लाख शेतकऱ्यांना झाला असून महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात कसे अव्वल राहील याचे नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेसाठी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्याच्या सहाय्याने अनेक निर्णय घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही एक ट्रिलियन डॉलरची करायची असेल तर ऊर्जा क्षेत्राची प्रगती करणे आवश्यक आहे आताची राज्याची स्थापित ऊर्जा क्षमता ही ४६ हजार मेगावॅट आहे ती ७६ हजार मेगावॅट कसे करायचे ही योजना आहे.
या प्रकल्पासाठी १९४०० मेगावॅट चे प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले, तसेच या प्रकल्पात ३ लाख ४० हजार कोटी रुपये गुंतवण्याचे उद्दिष्ट आहे सौर कृषी पंप योजना अंतर्गत १.५३ लाख कृषी पंप बसविले आणखी दहा लाख कृषी पंप बसविण्यात येणार तसेच महाराष्ट्र हे ग्रीन हायड्रोजन आणणारे पहिले राज्य ठरले.