अमरावती :-शेतकऱ्यांना शेत ओलीस करण्यासाठी सोलर पंप मिळत नाही आहे म्हणून अमरावती मधील चिखलदरा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी सोलर पंप मिळण्याच्या हव्यासापोटी गहु व चण्याची पेरणी केली, व उसनवारी पैसे भरून सोलर पंपाची मागणी केली तरी अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळालेला नाही.
म्हणून शेतकऱ्यांनी मनस्ताप व्यक्त करत २६ महिन्याआधी या योजने करता पैसे भरले असून सोलर पंप मिळेना याबद्दलची तक्रार केली.मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती मधील चिखलदरा व धारणी तालुक्यात नेहमी वीज खंडित होत असते म्हणून शेतकऱ्यांनी शेतीसाठी कुसुम योजना अंतर्गत सोलर पंप बसवण्यासाठी अर्ज केले,
या योजनेत काही रुपये शेतकऱ्यांना भरावे लागते या तालुक्यातील अनेक गोरगरीब शेतकऱ्यांनी उसनवारी पैसे भरून या योजनेचा अर्ज केला. व लाभार्थी शेतकऱ्यांची लिस्ट जाहीर होऊन कंपनीला नावे पाठवण्यात आली. १६ महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा या कंपनीचे अधिकारी फोन उचलत नाही व शेतात अजूनही सोलर पंप आले नाही, या कारणास्तव शेतकऱ्यांनी काटकुंभ परिसरातील ठाण्यात जाऊन तक्रार केली.
शेत ओलीत करण्यासाठी सोलर पंप मिळेना
कुसुम योजनेअंतर्गत सोलर पंप आज मिळेल, उद्या मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या चकरा मारल्या. शेतात गहू, मका, चना, बाजारा याची पेरणी करेपर्यंत तरी सोलर पंप येईल या ही अपेक्षा होती. पण उसनवारी पैसे भरूनही सोलर पंप मिळत नसल्याने पिकाची दुर्दशा होत आहे.