Gadchiroli

शेतजमिनीतील धान पिकाचे पुंजणे जळून खाक, शेतकऱ्याचे नुकसान

जोगीसाखरा : गडचिरोली जिल्ह्यातील जोगीसाखरा येथे
धानाची कापणी व बांधणी करून एकत्रित पुंजणे तयार करण्यात आले होते . नामदेव करानकर यांनी आपल्या शेतजमिनीत सुवर्णा धानाची लागवड केली .

धान कापणी व बांधणी होऊन जवळपास ७०० भाऱ्यांचा पुंजणा तयार करण्यात आला होता . त्यानंतर काही दिवसांतच ते थ्रेशर मशीनद्वारे मळणी करणार होते. मात्र, त्यावर काही लोकांची वक्रदृष्टी पडली . आणि १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता भर दिवसाच पुंजण्याला अचानक आग लागली. याबाबतची माहिती मिळताच शेतकऱ्यासह गावातील काही नागरिकांनी शेताकडे धाव घेतली; परंतु आग आटोक्यात आली नाही.

आणि या घटनेमध्ये तीन एकरांतील धानाचे पुंजणे जळून खाक झाले. शेतकरी नामदेव करानकर (रा. पाथरगोटा) यांचे सर्व्हे नंबर ३१९ व ३२० या ३ एकर शेतजमिनीतील धान पिकाचे पुंजणे जळून खाक झाले.

यात शेतकऱ्याचे १ लाखावर रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आरमोरी तालुक्याच्या पाथरगोटा येथे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली.

यात शेतकऱ्याचे एक लाख रुपयांच्यावर नुकसान झाले. शेतात आगी लागण्याचा हंगाम नसतानाही अचानक आग लागली कशी, की कोणी लावली, असा प्रश्न गावातील नागरिकांना पडलेला आहे.

शेतजमिनीतील धान पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल :

पाथरगोटा ते पळसगाव मुख्य रस्त्याला लागूनच करानकर यांची शेती आहे. निसर्गाच्या प्रकोपातून जे पीक वाचले तेही नियतीने त्यांच्याकडून हिरावून घेतले. त्यामुळे वर्षभर उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे. तर या प्रकरणात, शेतातील धान पुंजण्याला आग लावली
कोणी ?हा चौकशीचा विषय आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…

4 months ago

तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…

4 months ago

मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…

4 months ago

घराघरांवर क्युआर कोड लावले

अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…

4 months ago

रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…

4 months ago

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

4 months ago

This website uses cookies.