अमरावती:- अमरावतीमधील धामणगाव रेल्वे तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात गहू व हरभऱ्याची पेरणी झाली आहे, पण या पिकांवर जंगली जनावरांचा खुप आक्रमण दिसून येत आहे म्हणून या परिसरातील नागरिकांनी उपाय म्हणून शेताला साड्यांचे कुंपण केले. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील नागरिकांनी सोयाबीन पेरली होती. पाणी बरोबर न मिळाल्यामुळे शेंगा भरल्या नाही, सोयाबीनमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा नफा झाला नाही
म्हणून त्यांनी गहू व हरभरा पेरणी केली. या पिकावर रानटी जनावरांचा खूप हमला दिसून येतो रात्रीच्या वेळेस शेतात जागरण करणे, शेतकऱ्यांना परवडण्याजोगे नाही म्हणून उपाय म्हणून शेतकऱ्यांनी साड्यांचे कुंपण केले.याचा फायदा दिसून आला यामुळे शेतातील पिकाचे बचाव होत आहे , साडी ही बाजारामध्ये कमी दरात मिळत असल्यामुळे ती शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे.
काही शेताला तारेचे कुंपण असले तरी रानटी जनावरे कुंपण तोडून पिकाचे नुकसान करतात, साड्यांचे कुंपण केल्याने त्यांना त्या कुंपनाच्या आत काय आहे ते दिसत नाही. म्हणून शेतकऱ्यांना साड्यांचे कुंपण परवडण्याजोगे आहे असे शेतकरी म्हणतात.