भंडारा : खुल्या प्रचाराची अंतिम घटका सोमवारला
भरणार आहे. पक्ष, अपक्षांसह त्यांचे समर्थक व आतापर्यंत पक्षीय दबावात असणारे बंडखोर खुलून समोर निघण्याची शक्यता आहे. रॅली व मिरवणुकांनी रणसंग्राम गाजणार आहे. परंतु, रॅली व मिरवणुकांसाठी गर्दी दिसून न आल्यास
उमेदवारांत धास्ती आहे.
फुकट प्रचाराला जाण्याचे दिवस संपल्याने आता मजुरांची तजवीज केली जात आहे. त्यामुळे उद्या वाढीव दरात मजुरांना सर्वाधिक रोजगार मिळणार असल्याच्या चर्चा होत आहेत . विधानसभा निवडणूक प्रचाराला ५ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या १३ दिवसांच्या काळात निवडणुकांमुळे शहरांसह गावखेड्यातील शेकडो मजुरांच्या हातांना काम मिळाले आहे .
बेरोजगारांना तर सुगीचे दिवस आले आहे . चित्र पाहावयास मिळाले. नेत्यांच्या सभांना गर्दी जमविण्यासाठी
तसेच शहरांसह गावखेड्यात प्रचारासाठी आता फुकटची माणसं मिळण्याचे दिवस गेले आहेत.
झेंडे धरण्यासाठी, सांगेल ते काम करण्यासाठी पैसे देऊन मजूर कामाला लावले जात असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. सर्वच पक्ष व अपक्षांकडून मजुरांना प्रचार कार्यासाठी लावले जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
सभा, रॅलींना जनमत दाखवण्यासाठी प्रत्यक्ष घरोघरी प्रचार साहित्य वाटण्यासाठी मनुष्य- बळाची गरज भासत असते.
त्यामुळे अनेक उमेदवारांनी मजुरांचा फंडा अवलं- बल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी रोजंदारीने मजूर गोळा करण्याचा तसेच सभा, रॅलींमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.