गडचिरोली : गडचिरोली मधील सिरोंचा तालुक्यातील परसेवाडा परिसरातून प्राणहिता ही नदी ओलांडून ,तेलंगणात सागवण्याची तस्करीसाठी सागवान लपवून ठेवल्याची माहिती बामणी वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना मिळाली .या माहितीच्या आधारावरून वनविभागातील पथकाने 30 सप्टेंबर रोजी तस्करांवर धाड टाकली ,व दोन लाख 50 हजार रुपयांच्या किमतीच्या सागवानाची लठ्ठे जप्त केले .
गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यातील बामणी परिसरात मोठ्या प्रमाणात सागवनाची तस्करी केली जात होती ,यामुळे वनविभाग सतर्क झाला आहे .
त्यामुळे परसेवाडा अंतर्गत येणाऱ्या लंकाचेन गावाला लागून असलेला प्राणहिता नदीपात्रात सागवान लठ्ठे लपवून ठेवल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी बामणी प्रफुल्ल झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकाऱ्यांनी प्राणहिता नदीवर धाड टाकले असता ,तेलंगणा राज्यात सागवण्याची वाहतूक करणाऱ्या तस्करांना त्यांनी पकडले व एकूण 36 नग लठ्ठे जप्त केले .
जप्त केलेल्या या सागवनांची किंमत दोन लाख 50 हजार रुपये एवढी आहे.