वर्धा:- सामान्य नागरिकांना विविध कंपनीचे कॉल्स येतात हॅलो आम्ही डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनकडून बोलत आहे, तुमच्या सिमचा गैरवापर होत आहे म्हणून तुम्हाला सीबीआय अधिकाऱ्यांसोबत बोलावे लागेल असे बोलून वैयक्तिक माहिती मिळवून सायबर फसवणूक करीत असतात.
मिळालेल्या माहितीनुसार, असे बनावटी कॉल्स आले आणि तुम्ही कॉल रिसिव्ह केले तर वैयक्तिक माहिती त्यांना देऊ नका कारण सरकारी यंत्रणेकडून किंवा बँक अधिकाऱी अशा प्रकारचे कॉल्स करणार नाही, किंवा कॉल्स आले तरी वैयक्तिक माहिती कॉलवर विचारत नाही.कधी कधी हे गुन्हेगार अधिकारी असल्यासारखे आवाज काढून बोलत असतात
म्हणून सतर्कतेने अशा कॉलवर प्रतिसाद द्या. जास्त प्रमाणात असे कॉल्स कोणत्याही सीम मधून नाही तर लँडलाईन वरून केल्या जाते.आतापर्यंत जेवढे फसवणुकी झाल्या आहेत ह्या सामान्य मोबाईल क्रमांकावरूनच झाल्या असल्याचे समोर आले जर कोणते संशयास्पद कॉल्स आले तर सायबर पोलिसांना या प्रकरणाची तक्रार करावी.