वर्धा:- सायबर फसवणुकीपासून सावधान रहा असे आवाहन जिल्हा पोलीस व सायबर सेल विभागाने केले आहे, सोशल मीडिया सारख्या माध्यमातून विविध लिंक्स पाठवून किंवा आकर्षक जाहिराती पाठवुन आर्थिक फसवणूक होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार हे विविध जागी पैसे गुंतवण्याचे सांगतात.
एका महिन्यात २०० ते ३००% नफा मिळेल असे आमिष दाखवतात व्हाट्सअप मध्ये बनावट ग्रुप तयार करून मोठ्या कंपन्यांमध्ये तुमचे शेअर दिल्याचे भासवतात, सुरुवातीला इन्स्टा ,फेसबुक, व्हाट्सअप यांच्या वरून थोडाफार नफा मिळवून विश्वास प्राप्त करत असतात.नागरिकांना नफा मिळाल्यानंतर विश्वास बसत असतो .
व ते जास्त गुंतवणूक करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करत असतात, अशा फसव्या लिंक्स व आमिषापासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. मागील ११ महिन्यांमध्ये ३० ते ४० नागरिकांची सायबर फसवणूक झाल्याची माहिती मिळाली.
सायबर फसवणूक करताना कुठून येतात मॅसेज
सायबर फसवणूक करतांना टेलिग्राम, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब किंवा अश्लील व्हिडिओवर तुमचे चित्र लावून ब्लॅकमेल केले जाते. व साइट्स वरून लिंक पाठवून सायबर फसवणूक केली जाते, म्हणून अशा सायबर फसवणुकीपासून पासून सावधान राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस व सायबर सेल विभागाने दिले आहे.