वाशिम :- हवामान विभागाने शनिवारला जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागू शकते असा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात तीन दिवसापैकी शनिवार, रविवार व मंगळवार या दिवशी गर्जनासह पाऊस पडू शकते. यामुळे कापलेल्या सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात फटका बसु शकते.
गेलेल्या मागील पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यातच शुक्रवारपासून पाऊस अधुनमधून हजेरी लावल्याचे दिसून येते.शनिवारला अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन अंदाधुंद पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.
या अंदाजामुळे जिल्ह्यातील शेतकरी धस्तावले आहे शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी सुरू आहे, व काही शेतकऱ्यांची सोयाबीन सुडी शेतात सुकवण्यासाठी टाकलेले आहेत, या अंदाजामुळे सुड्या झाकण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची घाई सुरू असल्याचे चित्र बघायला मिळाले.