यवतमाळ :- आयकर विभागामार्फत निवडणुकीत होणाऱ्या रोख व्यवहारावर आयकर विभागाचे लक्ष राहील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका, मध्यवर्ती बँका, सहकारी बँका इत्यादी बँकावर आयकर विभागाचे कडक नियंत्रण आहे, या बँकांमधून १० लाख किंवा दहा लाखाच्यावर रक्कम काढल्यास त्या व्यक्तीवर आयकर विभागाचे लक्ष असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या काळामध्ये या पैशाचा वापर अवैध कामासाठी होऊ शकतो म्हणून हे कार्य पारदर्शक करण्यावर आयकर विभागाचा भर आहे.बँकांमध्ये हे काम बघण्यासाठी एक नोडल अधिकारी ठेवण्यात आले आहे व सर्व बँकांना रात्रीला नऊ पर्यंत सर्व आर्थिक कार्याचा अहवाल पाठवण्याचा आदेश विभागाने दिला, जर या संस्थांनी कोणत्या प्रकारे आर्थिक व्यवहार लपविले तर त्या देवान – घेवाण शीटची पाहणी करून संस्थेवर कारवाई करण्यात येईल.
या बँकांमधून एकापेक्षा जास्त खात्यामध्ये एका वेळेस पैसे पाठवले तर त्याचे कारण कोणते आहे यावर सुद्धा आयकर विभागाचे नियंत्रण राहील किंवा बँकेतील बंद खात्यामध्ये अचानक पैसे आले ते कुठून आले यावर विभाग लक्ष ठेवणार आहे. यासाठी लेखापाल, परीक्षक, उपनिबंधक इत्यादीच्या माध्यमातून अशी कामे करणाऱ्या वर लक्ष ठेवल्या जाईल.