अकोला:- वर्धेत एका प्रकरणात १८ वर्षाखाली पत्नी सोबत शरीर संबंध ठेवणे हे बलात्कार ठरते, असे नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी निर्णय दिले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव वैभव टेकाम (२४) हा सेवाग्राम येथील रहिवासी होता, याच्याविरुद्ध पिडीतेने तक्रार केली असता, आरोपी वैभवने स्वतःचा बचाव करत १८ वर्षाखाली पीडित मुलगी ही माझी पत्नी आहे.
व तिच्या सहमतीने शरीर संबंध ठेवले त्यामुळे मला दोषी ठरवता येणार नाही असा दावा न्यायालयात केला, शरीर संबंधामुळे मुलीला गर्भधारणा झाली होती. आरोपी मानण्यास तयार नसल्यामुळे डीएनए चाचणीवरून तिच्या गर्भातील बाळाचा बाप आरोपी असल्याचे माहित झाले तेव्हा मुलगी १८ वर्षाखालील असल्याचे जन्मतारखेच्या दाखल्यावरून सिद्ध झाले.
न्यायालयाने हा दावा गुणवत्ताहीन ठरवून १८ वर्षाखाली मुलगी विवाहित असो किंवा नसो तिच्यासोबत ठेवलेले संबंध हे बलात्कारच ठरवले जाईल, या मध्ये पीडीतेची शरीर संबंधाची संमती असली तरी कायद्यात याला तथ्य नाही. या प्रकरणात सत्र न्यायालयाने वैभव टेकामला १० वर्षाचा कारावास व ३,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
१८ वर्षाखाली पिढीतील दबाव टाकून शरीर सुखाची मागणी
आरोपी वैभवने पीडीतेला प्रेमाच्या जाळ्यात फसवून शरीर सुखाची मागणी करत होता, त्यांनी नागपूर रस्त्यावरील फार्म हाऊस मध्ये संबंध ठेवले त्यामुळे मुलीला गर्भधारणा झाली. व त्यादरम्यान मुलाने गळ्यात हार घालून लग्नाचा बनाव केला, गर्भधारणा झाल्याचे कळताच आरोपी गर्भपातासाठी पिढीतेवर दबाव टाकायचा. मुलीने गर्भपातासाठी नकार दिल्यास तिला निर्दयीपणे मारहाण केली यामुळे मुलीने सेवाग्राम पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.