अमरावती :- अमरावती मधील राणानगर येथे बनावट पदार्थ विकतात याची माहिती अन्न प्रशासनाला मिळताच , त्यांनी राणानगर येथे छापा मारून तूप, पाम तेल, वनस्पती तेल व बनावट केलेले पनीर असे पूर्ण ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.विशाल तिवारी नावाच्या आरोपीने हे विकण्यासाठी एक बनावटी कारखाना सुरू केलेला आहे आणि प्रशासनाने त्याच्याकडून बनावटी सामग्री जप्त केली आहे, येत्या सणासुदीच्या काळामध्ये असे बनावटी लोक पैसे कमावण्यासाठी सक्रिय होत असतात.
सणासुदीच्या काळामध्ये मिठाईमध्ये भेसळ खोवा, पनीर भेसळ असू शकते म्हणून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची मिठाई घेताना सतर्क बाळगावी, येन सणाच्या काळात या एकाच ठिकाणी नाही इतर जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी बनावटी मिठाई व पनीर बनवून विकल्या जात असतात.म्हणून नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे विशाल तिवारी याच्यावर कार्यवाही करताना जिल्हाधिकारी सुरेश वाघमारे, अन्नसुरक्षा अधिकारी गजानन गोरे व इतर अधिकारी सहभागी होते.