अकोला :- पोलिओ विषाणू पसरण्यापासून रोखणे अवघड आहे पण हा आजार जगाचा नकाशातून पुसल्या जाण्याची माहिती गुरुवारला एका तज्ञाने दिली.मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पोलिओशी प्रभावीपणे मुकाबला करण्यात आला. मात्र कोणत्याही हलगर्जीपणामुळे हा आजार पसरू शकतो किंवा हा आजार येण्याची शक्यता आहे असे डॉक्टर आनंद शंकर बंडोपाध्याय यांनी व्यक्त केले आहे,पोलिओ चे मुख्य तीन प्रकार आहेत टाईप १, टाईप २ आणि टाईप ३ हे तीन सेरोटाईप आहेत. त्यापैकी जगातून टाईप २ व टाईप ३ संपुष्टात आले आहे.
आणि टाईप १ विषाणू आफ्रिकन प्रदेशात, अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशांमध्ये दिसतात, भारत देश हा पोलिओ निर्मूलनाच्या मार्गावर आहे असे आपण म्हणू शकतो, बहुतेक देशांमध्ये पोलिओ अजिबात नाही ही अतिशय चांगली बातमी आहे.बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनशी संबंधित पोलिओ विरोधी टीममधील तंत्रज्ञान, संशोधन आणि विश्लेषण विभागाचे उपसंचालक बंडोपाध्याय हे म्हणतात की, भारताने पोलिओ निर्मूलनात अतिशय मोठे काम केले याचा मला अभिमान आहे.