वाशिम :- शेतकऱ्यांनी कृषी पंप जोडण्यासाठी फार्म भरले असून त्यांची कृषी पंप जोडणी मंजूर झाली आहे, पण प्रत्यक्ष शेतावर जाऊन सौर जोडणी देण्यासाठी खूप विलंब होत असल्याने अनेक शेतकऱ्यांकडून नाराजीच्या सुर उमटत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सौर कृषी पंप योजनेसाठी ५ हजार २५३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी साडेतीन हजार शेतकऱ्यांनी शुल्क भरले आहेत. शेतकऱ्याकडून दिवसाला विज पुरवठा व्हावा म्हणून त्यांनी कृषी पंप जोडणी वर भर दिला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी शुल्काची भरणा केले आहे त्या अर्जानुसार कृषी योजनेकडून सर्वेक्षण करण्यात आले, अडीच हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर होऊन खूप उशीर झाला परंतु प्रत्यक्ष सौर पंप जोडणी देण्यास कृषी योजनेतून विलंब होत आहे.काही शेतकऱ्यांनी खूप आधी पैसे भरल्यामुळे त्यांच्या मनात चिंता निर्माण झाली. अजून पर्यंत सौर पंप शेतात आले नाही तर रब्बी हंगामात सिंचन कसे करायचे हा शेतकऱ्यासमोर प्रश्न निर्माण झाला,यामुळे शेतकऱ्यांनी सामाजिक संघटनेसह कृषी कार्यालयात जाऊन कृषी पंप त्वरित देण्याची मागणी केली.