अकोला :- अकोल्या मधील सिरसोली गावात डेंग्यू , मलेरिया, टायफाइड या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, या गावात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असुन हा गाव अडगाव प्राथमिक केंद्रांतर्गत येते . या गावातील लोकांना कोणत्या प्रकारची शासकीय आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे येथील गावकरी त्रस्त आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील एकाच भागातले चार रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आले तरी, या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारचे विचारपूस व सर्वेक्षण केल्या गेले नाही.
गावातील रुग्णांना या विभागाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे खाजगी रुग्णालयामध्ये आर्थिक दंड सहन करावा लागत आहे. या गावात सरकारी दवाखाना आहे पण डॉक्टर नाही, दवाखान्यामध्ये औषध उपलब्ध नाही, याकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.या गावात ६ हजार लोकसंख्या असून आरोग्य विभागाचे या गावाकडे दुर्लक्ष आहे, आरोग्य विभागाने गावकऱ्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा गावकऱ्यांकडून आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात येत आहे.