बुलढाणा :- रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयात नाव नोंदणी करून पिक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतात किड, नैसर्गिक आपत्ती, किंवा कोणत्या प्रकारचा रोगांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळणार आहे. त्याचप्रमाणे कर्जदार व बिनकर्जदार इच्छेप्रमाणे या योजनेत सहभागी होऊ शकतात, या योजनेची अर्ज प्रक्रिया लवकर सुरू होण्याची माहिती मिळाली आहे.
२०२३ पासून ते २०२६ पर्यंत ही योजना राबविण्याचा राज्यशासनाने निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांचे विमा हप्ता रक्कम राज्यशासन भरणार असून शेतकऱ्यांनी फक्त एक रुपयात नोंदणी करून योजनेत सहभागी होता येईल.पिक विमा काढण्यासाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली आहे, या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी pmfby पोर्टल या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. रब्बी हंगामामध्ये पेरणी करणाऱ्या पिकांसाठी हा पिक विमा आहे, रब्बी मध्ये हरभरा, गहू, कांदा व बागायती शेती येत असते.