यवतमाळ :- आंतरजातीय विवाह करणाऱ्या वधू-वराला समाज कल्याण विभागाकडून आर्थिक मदत मिळत असते, म्हणून अशा जोडप्यांनी समाज कल्याण मध्ये अर्ज केले असून अजुनपर्यंत २१० वधू-वरांना आर्थिक मदत मिळाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये मिळते, राज्य शासनाने अशा अर्जावर लक्ष न दिल्यामुळे लग्न करणाऱ्या अनेक जोडप्यांना आर्थिक मदत मिळाली नाही.
मागील दोन वर्षापासून २१० जोडप्यांना ही मदत मिळाली नाही म्हणून हे जोडपे समाज कल्याण विभागांमध्ये ये-जा करत आहेत. विभागांमध्ये निधी नसल्याने लाभार्थ्यांना फक्त येरझारा माराव्या लागत आहे.या २१० जोडप्यासाठी विभागामध्ये एक कोटी ५ लाख रुपयांचा निधीची आवश्यकता आहे. मात्र निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे हे फाईल अडकलेली आहे, आता निवडणूक झाल्यानंतरच या विभागाचा विचार केला जाईल. नवीन सरकार आल्यानंतरच लाभार्थ्याच्या खात्यामध्ये नीधी वितरीत केला जाणार.