वर्धा :- २४ ऑक्टोबरच्या रात्री ९:०० सुमारास दोन गटांमध्ये उसनवारीच्या पैशाच्या वादातून शिवीगाळ व मारहाण झाली. ही घटना वर्धेतील पुलफैल परिसरामधील लाला लजपतराय शाळेजवळ घडली, या प्रकरणाची तक्रार २५ ऑक्टोंबर रोजी पोलीस ठाण्यात केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, घटनेमध्ये अश्विन तांबिया, सचिन अरेफन, प्रतीक तांबिया आणि इतर व्यक्ती सामील होते. तक्रारीनुसार प्रतीक तांबिया याने सचिन अरेफन याला दिलेले उसनवारीचे तीन हजार रुपये मागू लागला.
पैसे मागतात सचिन अरेफन याने प्रतीक तांबियाला गालावर थापड मारली, थापड मारल्यामुळे दोघांमध्ये खूप वाद निर्माण झाला एकमेकांना शिवीगाळ करत मारामारी करू लागले.दोन्ही युवकासोबत त्यांचे मित्र हाणामारीत सामिल झाले, एका गटातील व्यक्तीने दुसऱ्या गटातील व्यक्तीला चाकू मारला तर दुसऱ्या गटातील व्यक्तीने प्रतिकार म्हणून डोक्यावर तलवार चालविली, यामुळे दोन्ही गटातले व्यक्ती जखमी झाले.
अश्विन तांबिया यांच्या पोटावर लोखंडी चाकूने वार केले तर सचिन अरेफन यांच्या डोक्यावर तलवार चालविल्याने तोही गंभीर जखमी झाला. या दोन्ही गटातील व्यक्ती पोलीस ठाणे गाठुन एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली, पोलिसांनी केलेल्या तपासीनुसार या परिसरामध्ये चोऱ्या होत्या याच कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे.