भंडारा : या जिल्ह्यातील लाखांदूर येथे घरी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमानिमित्त,उरलेली भाजी घरातील फ्रीजमध्ये ठेवून, दुसऱ्या दिवशी खाल्ल्यावर एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे .मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सरांडी येथे 25 आॅक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता घडली आहे.
ताराबाई मुखरू कुंभरे (६५),
शालिनी रमेश कुंभरे (४०), गोवर्धन मुखरू कुंभरे (५२), सुजिता रमेश कुंभरे (१४), दुर्गा रमेश कुंभरे (११) अशी विषबाधा झालेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
ताराबाई कुंभरे यांच्या घरी गुरुवारी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उडदाच्या डाळीच्या पानवड्याची भाजी बनवण्यात आली होती. तेव्हा कार्यक्रमानंतर घरातील शालिनी रमेश कुंभरे,गोवर्धन मुखरू कुंभरे , सुजिता रमेश कुंभरे , दुर्गा रमेश कुंभरे या सर्वांनी जेवण करून उरलेली भाजी घरातील फ्रीजमध्ये ठेवली होती .
त्यानंतर सकाळच्या सुमारास फ्रीजमध्ये ठेवलेली भाजी गरम करून कुटुंबीयांनी खाल्ली होती. मात्र सायंकाळच्या सुमारास पाचही जणांची प्रकृती बिघडली . यामुळे त्यांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.