वर्धा :- २६ ऑक्टोंबर ला कोर्टात का येत नाही या कारणावरून तीन व्यक्तीने एका व्यक्तीस काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली , या प्रकरणाची तक्रार तळेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नारायण बोरवार आणि रामा नांदने यांची गावठी दारू महिला मंडळांनी पकडली, या प्रकरणाची केस कोर्टात सुरू होती या दोघांनाही तारखेवर कोर्टात जावे लागे. रामा हा नेहमी तारखेवर जायचा पण नारायण जात नव्हता .
नारायण बोरवार हा गावातल्या बाजारातून घराकडे जाण्यास निघाला तेवढ्यात रामा नांदने भेटला, रामा म्हणाला आपल्या विरोधात कोर्टात केस सुरू आहे तू येत का नाही.नारायण याने मी माझे बघून घेईल तू तुझे पहा, असे म्हटले असता रामा नांदने, लक्ष्मण नांदने , अजय नांदने यांनी नारायणला शिवीगाळ करून काठीने छातीवर व पाठीवर मारले. व लाथा बुक्क्यांनी मारून जखमी केले याप्रकरणी नारायण यांनी तिघा विरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.