गोंदिया :या जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रशिक्षणासाठी गेलेल्या एका शिक्षकाच्या घरात ,कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी एक लाख ९२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे.ग्राम कुडवा येथील वॉर्ड क्रमांक-१ मधील तिरोडा मार्गावरील, उत्तम सावजी हॉटेल समोर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक तेजसिग अंकुश आलोत हे निवडणुकीच्या प्रशिक्षणकरिता क्रीडा संकुल येथे गेले होते. त्यांच्या घरी कुणीही नसल्याने बघून भरदिवसा चोरट्यांनी मेन गेट व आलमारीचे कुलूप तोडून,२० ग्रॅम वजनाचा सोन्याचे नेकलेस , २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन साखळ्या ,१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन कानातील झुमके ,चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ,सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक व सोन्याचे ४० मणी ,एक ग्रॅम वजनाचा सोन्याचा गणेश लॉकेट नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील ,तीन जोड रिंग , दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंग ,एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील खडे
असे एकूण एक लाख ९२ हजार ७३५ रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.त्यामुळे रामनगर येथील पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.