वर्धा :- २ नोव्हेंबरला वर्धेमधील चितोडा येथे अंगावर जळता फटाका फेकल्यामुळे व्यक्तीने आरोपींना हटकले असता चार जणांनी एका व्यक्तीला काठीने, लाथाबुक्क्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.मिळालेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादीदार अविनाश शेंडे (५२) यांनी केलेल्या तक्रारीनुसार
अविनाश याने गायीगोदण्याचा निमित्ताने गावात हेल्या व म्हशीची डीजेच्या तालावर मिरवणूक काढली या दरम्यानच राज चक्रधर उपाध्याय, विश्वास उपाध्याय, खुशी उपाध्याय, राजकुमारी उपाध्याय हे स्लॅबवर फटाके फोडत होते, ते जळते फटाके यांनी खाली डीजे वाल्याच्या अंगावर फेकले
या कारणावरून अविनाश यांनी या चौघांना हटकले असता त्या चौघांनी लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली व तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिली.या घटनेनंतर अविनाश शेंडे यांनी त्वरित सेवाग्राम पोलीस स्टेशन गाठून चारही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.