भंडारा : या जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीनही विधानसभा मतदारसंघांतून सोमवारी २१ उमेदवारांनी माधार घेतली. यामुळे आता रिंगणात ५० उमेदवार उरले आहेत.या तीनही मतदारसंघांतील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असून तीनही विधानसभा मतदातसंघांमध्ये भंडाऱ्यात महायुती आणि साकोलीत महाआघाडीतील उमेदवारांना वगळता अन्य सर्व ठिकाणी बंडखोरांशी सामना करावा लागणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट), भाजप, काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडी याशिवाय अन्य प्रादेशिक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उतरविले आहेत.
जिल्ह्यात भंडारा मतदारसंघात महायुतीचे नरेंद्र भोंडेकर आणि साकोली मतदारसंघात
महाआघाडीचे नाना पटोले यांच्यापुढे बंडखोरांचे आव्हान नाही. असे असले तरी अन्य
ठिकाणी मात्र महायुती आणि महाआघाडीतील
सर्वच प्रमुख उमेदवारांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.
साकोली मतदारसंघात डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर यांच्याविरुद्ध बंडखोरी केली आहे. भाजपचाच उमेदवार महा-
युतीमध्ये हवा, अशी टोकाची भूमिका घेणाऱ्या या कार्यकर्त्यांची किती साथ त्यांना मिळते, हे आता महत्त्वाचे आहे. तुमसर मतदारसंघामध्ये
ठाकचंद मुंगूसमारे यांनी महाआघाडीचे उमेदवार चरण वाघमारे यांच्या-विरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे. हीच स्थिती महायुतीमध्येही आहे.
तिकडे धनेंद्र तुरकर यांनी राजू कारेमोरे यांच्याविरुद्ध बंडखोरी केलीआहे. सेवक वाधाये हे सुद्धा प्रहार जनशक्त्ती पक्षाकडून मैदानात आहेत.
भंडारा मतदारसंघात काँग्रेसच्या पूजा ठवकर यांना शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र पहाडे आणि स्वपक्षातील प्रेमसागर गणवीर या दोन बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे.