बुलढाणा :- बुलढाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबर पासून प्रचार जोमाने सुरू झाला आहे, बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात लढत बघायला दिसली या मतदारसंघांमध्ये फक्त १३ उमेदवार आहेत. त्यांनी प्रचार सुरू केला आहे. या निवडणुकीमध्ये शिंदेसेना व उद्धवसेना यांच्यामध्ये लढत होणार असून
निवडणुकीत वंचित उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा मतदारसंघांमध्ये भाजपचे विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे महायुतीमध्ये बिघाड झाली होती मात्र या उमेदवाराने ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राहिलेल्या १३ उमेदवारामध्ये तिरंगी लढत दिसण्याची शक्यता आहे
बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये ३ लाख ७ हजार १०६ मतदार आहेत. मतदात्यांच्या घरी जाऊन प्रचार करण्यासाठी पक्ष व अपक्ष उमेदवारांची चांगलीच कसरत होणार आहे.येणाऱ्या दिवसांमध्ये तालुक्यातील गावांमध्ये प्रचार करण्यासाठी उमेदवारांना सर्व गावांमध्ये फिरून प्रचार करावे लागणार, बुलढाणा विधानसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते पण ४ नोव्हेंबरला ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे १३ उमेदवारांमध्ये चांगलीच लढत होणार आहे.