चंद्रपूर :या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सोमवारी नामांकन अर्ज मागे घेतल्यानंतर ९४ उमेदवार रिंगणात आहेत . यातून लढतीचेही चित्र स्पष्ट झाले आहे . मात्र चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर मतदारसंघांत १५ पेक्षा अधिक उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे निवडणूक प्रशासनाकडून या मतदारसंघांत दोन बॅलेट युनिट लावण्यात येणार आहेत. मंगळवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष ईव्हीएमची रॅन्डम तपासणीही करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी १२० जणांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २६ जणांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता ९४ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. चंद्रपूर मतदारसंघात १६, वरोरा १८ व – बल्लारपुरात २० उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत एका मतदान यंत्रावर १५ उमेदवार अधिक एक नोटा असे १६ बटन असतात.
सर्वांत शेवटी नोटाचे बटन असते. या केंद्रांवर १५ पेक्षा अधिक उमेदवार असल्याने ईव्हीएम एकच राहील; मात्र
बॅलेट युनिट दोन लावण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाला राज्यातील ८७ विधानसभा मतदारसंघांत अशी
व्यवस्था करावी लागणार आहे. जिल्हा निवडणूक प्रशासन या दृष्टीने तयारी पूर्ण केली आहे.
प्रचार परवानगीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव राजकीय पक्षांना सभा, बैठका व प्रचारासाठी आवश्यक विविध
परवानग्या विहित वेळेत मिळाव्यात, यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे परवानगी काढण्यासाठी प्रमुख उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून कागदपत्रांचीजुळवाजुळव सुरू केल्याचे मंगळवारी 5 दिसून आले.
प्रचार फेरी, जाहीर सभा, चौक सभा यासह सर्व प्रकारच्या सभा, तहसील अंतर्गत सभा व रॅलीची परवानगी संबंधित पोलिस निरीक्षकांकडून प्राप्त होणार आहे. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात (पांढरा रंग) प्रचार वाहनाची परवानगी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून दिली जात आहे.