अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली आहे, परंतु या पिकांमध्ये जंगली रानडुकराचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, आता गेलेल्या खरीप हंगामाच्या सीझनमध्ये शेतकऱ्यांनी शेतात जे पीक लावले होते त्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने ,
त्यांनी रब्बी हंगामातील पिकातून भरपाई करून घेण्याचे ठरविले.म्हणून शेतकरी रब्बी हंगामामध्ये पेरलेल्या पिकांवर खूप मेहनत घेत आहेत, पिंपळखुरा या परिसरातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर रोपटे बाहेर आले व जंगली प्राण्यांचा व जास्तीत जास्त रानडुकराचा उपद्रव वाढला.
यामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त झाले व त्यांना रात्रीला जागरण करावे लागल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे दिसते, दिवसभर शेतात पिकासाठी काबाडकष्ट करायचे आणि रात्रीच्या वेळेस शेतात जागरण करायचे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांची दिनचर्या सुरू असल्यामुळे वनविभागातील अधिकाऱ्यांनी रानडुकरांचा बंदोबस्त करावा ही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.