भंडारा (कोसरा): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोंढा येथे एकूण ६ मतदान केंद्र मंजूर आहेत. या ६ मतदार केंद्रांत गावातील सर्व मतदारांची नावे आहे. मतदारांचे नाव जवळ असलेल्या मतदार केंद्रात समाविष्ट असणे अंत्यत गरजेचे होते. कारण मतदान करण्यासाठी कोंढा येथील मतदारांना, एकाच कुटुंबातील काहींना गांधी विद्यालय तर काहींचे नाव २ किमी दूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढा (टोली) येथे मतदान यादीत नाव असल्याने मतदारांची मतदान करण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती .
कोंढा येथे एकूण ६ मतदान केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी ४ मतदार केंद्र गांधी विद्यालय कोंढा येथे तर २ मतदान केंद्रे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढा (टोली) येथे आहेत.
परंतु एकाच वॉर्डातील मतदारांची नावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढा (टोली) अनेकांची नावे गांधी विद्यालयातील मतदार केंद्रामध्ये नाव होते.
एकाच कुटुंबातील लोकांना इकडून तिकडे पायपीट करावी लागली. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. सक्षम लोकशाहीसाठी एक मतदान आवश्यक असते अशा नारा दिला जातो.
यासाठी सोयीचे जवळील मतदान केंद्र मतदारांना दिले परंतु कोंढा येथे मतदारांची पायपीट झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. गांधी विद्यालय जवळील जवळ असलेल्या कुटुंबातील मतदारांची नावे हे कोंढा (टोली) च्या शाळेमध्ये असल्याने इकडच्या लोकांना जाण्यासाठी २ किमी पायी जावे लागले. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला.
मतदारांचे नाव जवळ असलेल्या मतदान केंद्रात समाविष्ट करण्याची मागणी :
यापुढे तरी निवडणुकीत एकाच कुटुंबातील सर्व नावे एकाच मतदान केंद्रामध्ये समाविष्ट करण्याची मागणी येथे मतदारांनी केली आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी, असेही नागरिकांचे म्हणने आहे.