वर्धा :- आणिबाणीच्या प्रसंगात शहरातील किंवा ग्रामीण भागातील व्यक्तींना त्वरित १०८ क्रमांक रुग्णवाहिका अद्ययावत ॲपद्वारे सुद्धा उपलब्ध होणार आहे. या ॲपवरून रुग्णवाहिका कुठे आहे, कुठपर्यंत पोहोचली याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. या ॲपची सेवा मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये १०८ नंबरची रुग्णवाहिका खूप चालतात, पण गरज भासल्यास ते कुठपर्यंत पोहोचली घटनास्थळी येण्यासाठी किती वेळ लागेल. हे समजत नाही नागरिकांचा असा समज झाला आहे की १०८ नंबरवर काॅल केल्यानंतर ही रुग्णवाहिका येत नाही,
व सामान्य नागरिक मिळेल त्या वाहनाने रुग्णाला हलवत असतात. म्हणून प्रशासनाने रुग्णवाहिकेवरचा विश्वास वाढावा म्हणून रुग्णवाहिकेसाठी एक ॲप तयार केले, ज्या द्वारे रुग्णवाहिका कुठपर्यंत पोहोचली हे कळण्यास मदत होईल. हा ॲप मार्च २०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येणार ॲपमध्ये सहकारीसह खासगी रुग्णवाहिका समावेश करणे सुरू आहे.
आणीबाणीच्या प्रसंगात त्वरित मिळणार डॉक्टरांचा भ्रमणध्वनी क्रमांक
आणीबाणीच्या प्रसंगामध्ये १०८ क्रमांकावर कॉल केल्यानंतर त्या ॲपवरून त्वरित मिळणार डॉक्टरांचा व रुग्णवाहिका चालकांचा भ्रमणध्वनी क्रमांक