बुलढाणा:- २० नोव्हेंबरला निवडणुकीचे कामानिमित्त २६८ बसेस राखीव ठेवण्यात आल्या होत्या , त्यामुळे दोन दिवस बससेवा प्रभावित असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आजपासून संपूर्ण बसेस नियोजित वेळ व मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी धावणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या राखीव ठेवलेल्या बसेस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर नोडल अधिकारी , मतदान केंद्राधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना साहित्यासह सोडण्यासाठी प्रशासनाकडून राज्य परिवहन महामंडळा सोबत करार करून बसेस बुक करण्यात आल्या होत्या.
जिल्ह्यातील संपूर्ण बसेस निवडणुकीच्या कामानिमित्त बंद असल्यामुळे मंगळवार व बुधवारला नागरिकांना प्रवास करण्यास अडचण निर्माण झाली, काही दुर्मिळ बसेस सुरू होत्या त्यांच्या जास्तीच्या फेऱ्या करून प्रवाशांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न आगाराकडून करण्यात आला. दोन दिवसाच्या अडचणी नंतर आजपासून सर्व बस स्थानकावरील बस सेवा सुरळीत झाली आहे.
निवडणुकीचे कामासाठी बुलढाणातील सात मतदारसंघांमध्ये राखीव बसेस
निवडणुकीच्या कामासाठी मलकापूर येथून ३०, बुलढाणा ४२,चिखली ३९, सिंदखेडराजा ४३, मेहकर ४३, खामगाव ३१ व जळगाव जालना येथून ४० बसेस राखीव ठेवण्यात आल्या होत्या