बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या चित्रफिती व व्हिडिओ बनविले, यामुळे मोबाईल पोलीस व निवडणूक आयोगासाठी डोकेदुखी ठरला आहे. बुलढाणा मध्ये विविध मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन आत जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक कायद्यानुसार मतदान चालू असतांना १०० मीटरच्या आत मोबाईल परवानगी नाही, तरी अनेक युवक या नियमाचा भंग करीत मोबाईल आत घेऊन वोटिंग केलेले व्हिडिओ व व्हीव्हीपॅटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर प्रसारित करीत असतात.
या विधानसभा निवडणुकीमध्ये हा प्रकार घडल्याने पोलीस व निवडणूक आयोगासमोर मोबाईल हे डोकेदुखी ठरले आहे.मोबाईल मतदान केंद्राच्या आत नेल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये वाद झाले तर काही मतदान केंद्रावर मोबाईल न नेण्याच्या सूचना मानुन सूचनांना प्रतिसाद दिला.
मोबाईल जमा करण्यासाठी कोणत्या सूचना दिल्या
पोलिसांनी मोबाईल बाहेर ठेवण्यासाठी मतदारांना पूर्वीच सूचना दिल्या, मतदान कक्षात जाताना मोबाईल बाहेर असलेल्या पोलिसाकडे ठेवावा. किंवा सोबत असलेल्या नातेवाईकाकडे मोबाईल जमा करावा या सूचना पोलिसांनी मतदारांना दिल्या.