यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे, हा निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे यांनी दिला.मिळालेल्या माहितीनुसार, २० जूनला मानसिक विकलांग १३ वर्षीय बालकावर अत्याचार करण्याची तक्रार वडिलांनी दिली होती,
आरोपीचे नाव शेषराव धुळे यांनी मानसिक विकलांग बालकाला जांभूळ खाण्यासाठी पैसे देतो, याचे आमिष दाखवून शेतात नेले. व तिथे नेऊन त्याच्यावर अत्याचार केला याप्रकरणी प्रत्यक्ष विकलांग बालक, आई-वडील व इतर लोकांनी सबळ पुरावा दिल्यामुळे पोलिसांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले,
सरकारी पक्षाकडून प्रत्यक्ष विकलांग बालक, वैद्यकीय तपासणी करणारे अधिकारी, मुख्याध्यापक, आई, वडील यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली आहे. याप्रकरणी दखल घेऊन न्यायालयाने आरोपीला ५ वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
विकलांग बालकांसाठी साक्ष देणारे
मानसिक विकलांग बालकासाठी न्यायालयात साक्ष देण्यासाठी प्रत्यक्ष बालक, आई-वडील वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक यांनी दिलेल्या साक्षीमुळे आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मिळाली.