अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित वेळेत गुणवत्तापूर्वक कचरा संकलन होतो की नाही हे तपासण्यासाठी प्रत्येक घरावर व खाजगी सरकारी जागांवर क्यूआर कोड लावले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक घरावर शासनातर्फे नियुक्त केलेल्या खाजगी संस्थेमार्फत क्युआर कोड लावण्याचे काम सुरू आहे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दैनंदिन कचरा संकलनासाठी शहरांमध्ये आयसीटी बेस्ट प्रणाली कार्यरत करण्यात येणार आहे. तसेच ओला व सुका कचरा साठवून ठेवण्यासाठी कचरापेटीवर विशिष्ट कोड लावण्यात येणार,
आणि घरासमोर कचऱ्याची गाडी आल्यानंतर त्यामध्ये कचरा टाकून क्यूआर कोड स्कॅन करायचे आहे, याने घनकचरा गाडी नियोजित ठिकाणावर गेली की नाही याची माहिती घनकचरा विभागाला मिळणार आहे.
घराघरांवर क्यूआर कोड लावल्याने होणार तक्रारीचे निराकरण
घरासमोर जर नियमित घनकचरा गाडी आली नाही तर या क्यूआर कोड च्या माध्यमातून नियमित ठिकाणी कचरा गाडी गेली की नाही, याची माहिती मिळेल यामुळे कामांमध्ये पारदर्शकता येऊन जास्तीत जास्त कचरा संकलन होणार आहे.