अमरावती: उद्योगांमध्ये राज्य आघाडीवर आहे म्हणून या क्षेत्रामध्ये स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचे टक्केवारी वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. शुक्रवारला महाराष्ट्राचे उद्योग भरारी कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आमदार रवी राणा आणि एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्यात ग्रामीण पातळीवर रोजगार निर्माण करणारे विश्वकर्मा योजना चांगल्या प्रकारे राबविण्यात आली. या योजनेमध्ये ५० हजाराच्या जवळपास नोंदणी झाली .यातील ३० हजार लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले. व दोन वर्षात ३५ हजार तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्यातील एकही उद्योग बाहेर जाऊ दिल्या जाणार नाही. उद्योग विभाग ग्रामीण पातळीवरील रोजगारा सोबत मोठे उद्योग राज्यात आणण्यासाठी कार्य करीत आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील स्टिल क्षेत्रातील गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. येणाऱ्या एक वर्षांमध्ये संपूर्ण बाजारपेठेचे चित्र बदललेले असेल.
तसेच लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या पैशामुळे बाजारपेठेतील आवश्यक वस्तूंची खरेदी होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला एक प्रकारची गती मिळालेली आहे, यामुळे राज्याच्या आर्थिक त्यांना मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राचा विकास करणे महत्त्वाचे आहे.
विदर्भाचा विकास व्हावा यासाठी नांदगाव येथे पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे.
जे अधिकारी आलेल्या उद्योगाची माहिती नाही देणार, त्यांना नोटीस देण्यात येणार
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे जिल्ह्यात आलेले नवनवीन उद्योग, तसेच आलेल्या कंपन्याविषयी एमआयडीसीचे आरओ माहिती देत नसल्याचे पत्रकारांनी केली तक्रार, यावेळी संबंधित आरओ यांनी जे काही चांगलं वाईट असेल त्याची माहिती प्रसार माध्यमांना द्यायला हवी. दर आठवड्याला एमआयडीसीमध्ये ज्या घडामोडी होतात त्या माहिती देण्याची नोटीस आरओ यांना देण्यात येणार असे उदय सामंत म्हणाले.