अमरावती :- साबणपुरा या गावामध्ये कृष्णा नावाच्या व्यक्तीने सोनपापडी आणि फरसाण व्यवसायाच्या नावाखाली प्रतिबंधित गुटखा व्यवसाय करत होता. ही घटना रविवारी १० वाजता उघडकीस आली. पोलिसांनी गोदामात लपवून ठेवलेल्या ७० मोठी पोती जप्त करून ९ लाख १ हजार ९६० रुपयाच्या मुद्देमाल ताब्यात घेतला. सीआययु पथकाने एक प्लॅन रचला त्यांना माहित झाले होते साबणपुरा येथिल श्रीनिवास झंवर हे सोनपापडीच्या नावाखाली गुटखा विक्री व्यवसाय करतात.
त्यांनी झंवर यांच्या घरी तिसऱ्या माळ्यावर धाड टाकली. व गुटखा जप्त केला या प्रकरणासंबंधी पोलीस पथकाने अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिली त्यानंतर एफडीए ची टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपी श्रीनिवास झंवर हे विक्रेता बडनेरा मधील शेख चांद यांच्याकडून गुटका घेत होता.झंवर यांचे तीन मजली घर आहे, पहिल्या मजल्यावर सोनपापडी व फरसाण विक्रीच्या व्यवसाय आहे. तर दुसऱ्या माळ्यावर कुटुंब राहते आणि तिसऱ्या माळ्यावर गुटखा गोदाम आहे. झंवर हे वेगवेगळ्या कंपन्याकडुन गुटका विकत घ्यायचे व अमरावती शहरात विकायचे पोलिसांनी छापा मारून श्रीनिवास झंवर यांना अटक केली.