यवतमाळ:- १५४६ शेतकऱ्यांनी पी.एम किसान पोर्टलवर स्वतः नोंदणी केली आहे .पण नोंदणी करण्याआधी सहा महिने आधीच्या फेरफार ,सातबारा, आधार कार्ड इत्यादी कागदपत्र अपलोड करणे महत्त्वाचे आहे.त्याशिवाय त्या अर्जाला मान्यता मिळत नाही तालुका व उपविभाग स्तरावरूनच असे अर्ज फेटाळले गेले, ३७४ शेतकऱ्यांनी ई -केवायसी केले नाही .४४६ शेतकऱ्यांनी आधार सिडिंंग केले नाही.
त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करून त्यांना पीएम किसान च्या हप्ता मिळणार नाही. शासकीय अनुदान मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे .या अर्जसंबंधी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक ,कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी कार्यालयात संपर्क साधावा.आणि (अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर फॉर्म) या पर्यायाचा वापर करून पूर्ण माहिती अपलोड करावी