वाशिम:- रानमेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिताफळांची चव चाखण्यासाठी शहरवासीयांची पसंती बघून शहरातील बाजारपेठेत सीताफळांची चांगलीच आवक वाढली आहे .या बाजारपेठेमध्ये प्रति किलो ४० किंवा ५० रुपये दराने विक्री होत आहे. बाजारपेठेमध्ये महिलांनी जागोजागी सीताफळांची दुकाने लावली आहेत ,
या महिला हंगामानुसार शहरवासीयांना चिंचा ,बोरं , चार ,जांभूळ, टेंभुर अशा अनेक प्रकारचे गावरानी रानमेवा (सीताफळ )उपलब्ध करून देत असतात .आणि शहरवासी या रानमेवाला खूप आवडीने घेतात ,ज्याप्रमाणे शहरातील बाजारपेठेमध्ये केळी व सफरचंद ची दुकाने लागतात तसेच या हंगामात सीताफळ सुद्धा चांगल्या किमतीमध्ये विकल्या जातो.