यवतमाळ:- पांढरकवडा तालुक्यामध्ये अनेक दुकान हॉटेल्स व ढाब्यांना दारू विक्रीची परवानगी नसताना सुद्धा मद्य विकत असतात.तसेच ज्यांच्याजवळ मद्य विक्रीचे लायसन्स आहे ते परवानाधारक मोठ्या प्रमाणात या लोकांना मद्य उपलब्ध करून देतात, ग्रामीण भागामध्ये असलेले छोटे- मोठे दुकाने व पानटपऱ्यामध्ये मद्याची विक्री होतांना दिसते.
शहरी भागातून मद्य ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी दुचाकीचा वापर करून घरपोज मद्य पोहोचवतात. दुचाकीवर मागे दारूचे बॉक्स ठेवून मद्य नेल्या जाते ,हा प्रकार प्रशासन यंत्रणेला माहीत असतांनाही हेतूपुरस्सरपणे त्याकडे लक्ष दिल्या जात नाही .
अवैध दारू विक्री बंद का करत नाही असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित होत आहे .ज्या ढाब्यावर मद्य विक्री होते तेथील खाद्य आरोग्यासाठी धोकादायक आहे का ?असे प्रश्न निर्माण होत आहे याकडे सबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे अशी जनसामान्यांची मागणी आहे.