वाशिम:- धान्य व कडधान्यासह खाद्यतेल महाग झाले त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, महिन्याभरात खाद्यतेलाच्या किमतीमध्ये ३० ते ४० रुपयांची वाढ झाली. १२० रुपयाचे तेल १४० ते १४५ रुपये झाले. सणासुदीच्या काळामध्ये खाद्य तेलाचा वापर जास्त असतो, म्हणून सर्वसामान्य कुटुंबाला याचा फटका बसला आहे.
दिवाळीमध्ये गव्हाला जास्त मागणी असते, यावेळेस गव्हाचे उत्पादन कमी झाले म्हणून सध्या बाजारात रवा, मैदा, पीठ यांच्यामध्ये दर किलो रु १० रुपये वाढ केली.
तसेच कडधान्यांमध्ये ३ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली, मसूरची डाळ प्रति किलो ५ ते १० रुपयांनी वाढून ८० ते १०० रुपये झाली. दर सणाला खाद्यतेलामध्ये वाढ होत असते, यावेळेस किराणा साहित्याचे भाव खूप वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबांना खूप अडचण जाणार आहे.