गोंदिया :या जिल्ह्यातील घोट गावात कर्जाची रक्कम बनावट एजंटने फसवून नेले.
फायनान्शिअल इन्क्लूझन लिमिटेड या कंपनीकडून, 10 बचत गटाच्या 50 महिलांनी कर्ज घेतले होते, प्रत्येक आठवड्याला त्या कर्जाची नियमितपणे परतफेड सुद्धा त्या करत होत्या .
घोट येथे राहणाऱ्या लोपा धनराज मोटघरे या महिलेकडे कर्जाच्या परतफेडीची रक्कम सगळ्या महिला गोळा करत होत्या.मग ही रक्कम कंपनीकडून येणाऱ्या एजंट ला दिली जात होती .
परंतु लोपाबाईकडे दोन व्यक्ती कंपनीचे एजंट बनुन आले .आणि त्यांनी महिलांकडून गोळा केलेले 70000 रुपये फसवणूक घेऊन घेतले. त्या दोन व्यक्तीनीं कंपनीचे एजंट असल्याचे भासवले, त्याच्या गळ्यात कंपनीची लेस देखील होती .
त्यामुळे या घटनेसंदर्भात दोन अनोळखी व्यक्तींवर गोरेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६, (२), ३१८, ४ (३), ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुजित घोलप तपास करीत आहेत.