वाशिम:- लग्नाच्या आधी मुला किंवा मुलीला खोटी माहिती दिल्यास व ती लग्नानंतर सामोर आल्यास पोटगी किंवा घटस्फोट नाही तर लग्न सुद्धा बेकायदेशीर ठरू शकते. ते करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात दाद मागावी लग्न बंधनात जुळण्यापूर्वी वधू वरांना खरी माहिती द्यावी त्यांच्या कुटुंबांनी सर्व उघड करून सांगावे, सामोरच्या कुटुंबाला त्रास देईल अशी माहिती लपवून ठेवली जाते लग्नानंतर पती-पत्नीला माहिती कळाल्यानंतर न्यायालयात जात असतात .
वाशीम येथे १० लाख लोकसंख्या असून आतापर्यंत येते कौटुंबिक न्यायालय सुरू झालेले नाही पण अशा प्रकारचे कौटुंबिक कलहाची कारणे दिवानी न्यायालयात चालवून न्याय मिळवून दिल्या जातो. लग्न झाल्यानंतर एक वर्षाच्या आत पती किंवा पत्नीला माहित झाले की,फसवणूक झाली म्हणून तेव्हा कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करू शकतो व न्याय मागते येते.