गडचिरोली :या जिल्ह्यातील विहीरगाव या तालुक्यांमध्ये रानटी हत्तीने दोन दिवस मुक्काम केला होता. आता रानटी हत्तींनी आपला मोर्चा पोर्ला वनपरिक्षेत्रातील ,चुरचुरा या उपक्षेत्राकडे वळविला आहे .
आता शेतीमध्ये अल्प मुदतीच्या धान पिकाची कापणी सुरू आहे, तर मध्यम प्रतीचे धानसुद्धा काही दिवसातच कापणीला येतील, सध्या याच शेतीच्या आवारामध्ये हत्तींनी वावर सुरू केला आहे .
आणि त्यामुळे तेथील शेतीच्या पिकाची नासाडी होत आहे.त्यामुळे काही दिवसातच आपल्या हाती पीक येईल ,अशी आशा बाळगून असलेले शेतकरी चिंतनग्रस्त झालेले आहे. या रानटी हत्तींचा बंदोबस्त लवकरात लवकर वनविभागाने करावे अशी मागणी तेथील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.