बुलढाणा:- द्वितीय वर्षाचे जनरल नर्सिंग अँड मिडवाईफची पेपरफुटी चौकशी करण्याकरिता एक समिती गठीत करण्यात आली, या प्रकरणाची जास्त माहितीकरीता महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन विभागाकडून मार्गदर्शन घेतल्याची माहिती मिळाली.द्वितीय वर्षाचा नर्सिंगचा पेपर सुरू असतांना १० ऑक्टोंबर रोजी काही विद्यार्थ्यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले होते.
त्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये पेपर दिसून आला त्यामुळे आता जवळपास १४ विद्यार्थ्यांची चौकशी केली आहे, नेमका हा पेपर कोणत्या ठिकाणाहून लीक झाला. याची माहिती प्रशासन यंत्रणा घेत आहे.काही विद्यार्थ्यांना सकाळी ८ वाजता १० ऑक्टोबर रोजी मिळाल्याचे आढळून आले. या प्रकरणाची उघड करण्याकरिता पूर्ण यंत्रणा मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहे.