बुलढाणा:- ९ ऑक्टोंबरला बुलढाणा तालुक्यातील मासरूळ मध्ये जोरदार पावसाने सोयाबीन, मका, फळबागा, कपास इत्यादी पिकांचे नुकसान झाले, व सुसाटच्या वादळी वाऱ्यामुळे मक्याचे पीक जमिनीवर पडले.पावसामुळे सोयाबीन सोंगणी थांबल्या व सोयाबीनचे दाणे फुलले त्यामुळे पूर्ण पीक उध्वस्त झाले.
खरीप हंगामाच्या शेवटी हातात आलेल्या मालाचे नुकसान झाले, बुधवारला काही शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगुन ठेवली जोरदार पावसामुळे त्या पिकाची नासाडी झाली.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून त्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हा प्रमुख व पंचायत समिती सदस्य यांनी केली.